अमित ठाकरेंची बंद दाराआड पदाधिकाऱ्यांशी चर्चा
नाशिक : गोरख काळे
एकेकाळी नाशिक शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळ्खले जायचे. मात्र पक्ष अडचणीत असताना एक-एक करत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठ्ही दिली. सध्या पक्षाची स्थिती कमकूवत झाली असली तरी मनसे प्रमुख राज ठाकरे(RAJ THACKERAY) यांच्याकडून करिश्मा होण्याचा आशावाद मनसैनिकांना आहे.
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (AMIT THACKERAY) यांनी नाशिककडे लक्ष केंद्रीत केले. मंगळ्वारी (दि.28) त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्याशी बंद बंद दाराआड चर्चा केली.
हेही वाचा : राज ठाकरे लीलावतीत आज दाखल होणार
पक्षाला गत वैभव मिळवून देण्याकरिता मनसे युवा नेते अमित ठाकरे(AMIT THACKERAY) यांच्या समोर आव्हान असणार आहे. पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांना नाशिककडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. मंगळ्वारी त्यांनी शहरातील राजगड कार्यालयावर सहाही प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी बंददाराआड चर्चा करत, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. बैठकीत केवळ संबंधित प्रभागातील पदाधिकार्यांनाचा प्रवेश होता.
सध्या नाशिक महापालिकेत प्रशासकर राजवट असल्याने ऑक्टोबर मध्ये पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शहरातील पक्ष संघटनेत सुरु काय आहे, याची अमीत ठाकरे यांनी माहिती जाणून घेतल्याचे समजते आहे. दरम्यान नाशिक हे राज ठाकरे(RAJ THACKERAY)यांचे आवडते शहर राहिले आहे. परंतू सप्टेंबर 2021 नंतर ते शहराकडे आलेले नाहीत. 2012 साली मनसेने पालिकेत सत्ता मिळवली होती. परंतु अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे मोठा फटका पक्षाला बसला. आणि 2017 मधील पालिका निवडणुकीत सपाटून मार खावा लागला.