नाशिक :प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भाव सातत्याने वाढत असताना ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुहुर्ताची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 60000 रूपये होता तर दुपार नंतर मात्र सोन्याच्या भावात घसरण होऊन 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 58300 रूपये आहे. तर सकाळी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 55000 हजार रूपये होता. त्यात घसरण होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 53400 रूपये झाला आहे.