नाशिक ः प्रतिनिधी
परिवहन मंत्र्यांनी 31मार्चपयर्ंत कामावर हजर झाल्यास एस.टी कर्मचार्यांवरची कारवाई मागे घेण्याची घोषणा केल्याने कर्मचारी कर्तव्यावर हजर होण्यास सुरूवात झाली आहे.मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे.अल्टीमेटमनंतर केवळ 23 कर्मचारी रुजू झाले आहेत.येत्या दोन दिवसात अजून कर्मचारी हजर होण्याची अपेक्षा अधिकार्यांकडून व्यक्त होत आहे.
नाशिक विभागात 297 बसेस नाशिक,मालेगाव,मनमाड,सटाणा,सिन्
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा नोव्हेंबरपासून संप विविध मागण्या आणि मुख्य विलिनिकरणाच्या मुद्यावर सुरू आहे.संपावर योग्य तोडगा न निघाल्याने संपकरी संपातून माघार घेत नसल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून जावे लागत आहे.परिणामी एस.टी.च्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे.संप मिटावा यासाठी सर्व प्रयत्न करूनही संपकरी आपल्या मुद्यावर ठाम असल्याने बडतर्ङ्ग आणि निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली.त्यामुळे काही प्रमाणात कर्मचारी कामावर हजर झाले परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने कंत्राटी कामगारांची भरती करण्याचे आदेश काढण्यात आले.अटीशर्तीसह कंत्राटी कामगार भरती करूनही पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्यात अपयश येत आहे.दरम्यान संपाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.न्यायालयाने आदेशानुसार नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालय आणि मंत्रीमंडळात सादर करण्यात आला. राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे समितीने सांगितले आहे.त्यामुळे संपाचा तिढा सुटलेला नाही.
सुनावणी पूर्ण होवून योग्य निर्णय मिळणार नाही तो पर्यत कामावर हजर न होण्याचा निर्णय कर्मचार्यांनी घेतल्याने परिवहन मंत्र्यांनी कारवाइ मागे घेण्याची घोषणा केली.परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी 31 मार्च पर्यत कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम देण्यात आला.या घोषणेचा अत्यल्प परिणाम दिसून येत आहे.