शहरातील आठ पोलिस ठाण्यांना लाभले नवीन प्रभारी
– राजू पाचोरकर म्हसरूळ तर न्याहदे आडगावला
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
शहर पोलिस दलातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यात राजू पाचोरकर यांना म्हसरूळ तर दिलीप ठाकूर यांच्याकडे सरकारवाडा पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. या खांदेपालटामुळे म्हसरूळ, आडगाव, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, देवळाली, उपनगर, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी लाभले आहेत.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी २१ प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
राजू भिकाजी पाचोरकर, अंबड पोलिस ठाणे, चुंचाळे चौकी (म्हसरूळ पोलिस ठाणे). शंकर शाहू खटके, नियंत्रण कक्ष (विशेष शाखा). सुभाष ढवळे, नियंत्रण कक्ष (शहर वाहतूक शाखा, युनिट एक). भगीरथ शिवाजी देशमुख, नियंत्रण कक्ष-पासपोर्ट विभाग (आर्थिक गुन्हे शाखा). सुभाष कोंडाजी पवार, शहर वाहतूक शाखा (पीसीबी-एमओबी). इरफान गुलाब शेख, आडगाव (पोलिस कल्याण व प्रशिक्षण शाखा). सोहन कनियन माछरे, नियंत्रण कक्ष (शहर वाहतूक शाखा-युनिट २). रियाज ऐनुद्दीन शेख, गंगापूर (सायबर पोलिस ठाणे). दिलीप श्रावण ठाकूर, भद्रकाली (सरकारवाडा). अशोक सुखदेव साखरे, म्हसरूळ (नियंत्रण कक्ष). प्रविण श्रीराम चव्हाण, अमली पदार्थ विरोधी पथक (देवळाली कॅम्प). अशोक निवृत्ती नजन, नियंत्रण कक्ष (अंबड पोलिस ठाणे). नितीन दौलतराव पगार, नियंत्रण कक्ष (इंदिरानगर पोलिस ठाणे). गजेंद्र रघुनाथ पाटील, नियंत्रण कक्ष (भद्रकाली पोलिस ठाणे). तुषार मुरलीधर अढावू, नियंत्रण कक्ष (सरकारवाडा पोलिस ठाणे). जितेंद्र भिमराव सपकाळे, नियंत्रण कक्ष (पंचवटी पोलिस ठाणे). कुंदन ज्योतीराम जाधव, देवळाली कॅम्प (विशेष शाखा-पासपोर्ट विभाग). गणेश मधुकर न्याहदे, इंदिरानगर (आडगाव). श्रीकांत शामराव निंबाळकर, अंबड (गंगापूर पोलिस ठाणे). विजय विष्णू पगारे (उपनगर). रंजित पंडीत नलावडे, पंचवटी (गुन्हे शाखा युनिट दोन).