भावी डॉक्टरांना गंडा; दिली विमानाची बोगस तिकिटे

‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांची फसवणूक; विमानाची बोगस तिकीटे दिली

– पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
रशियातील किरकिस्थान येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या ४७ विद्यार्थ्यांना विमान प्रवासासाठी बनावट तिकीटे देऊन फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या पैशांच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आल्याने पालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिस या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
दिनेश सुभाष खैरनार (रा. साई शक्ती रो हाऊस, आनंद नगर, पाथर्डी फाटा) यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. खैरनार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचा मुलगा करण खैरनार हा रशियातील किरकिस्थान या ठिकाणी एमबीबीएस शिक्षण घेत आहे. पहिले वर्ष पूर्ण करून दोन महिन्याच्या सुट्टीसाठी त्याला भारतात परत यायचे असल्याने त्याने परतीच्या प्रवासासाठी बिशकेक ते मुंबई व मुंबई ते बिशकेक असे विमान तिकीट काढण्यासाठी प्रतीक दादाजी पगार (वय २५, रा. रामनगर, मोरे मळा, हनुमान वाडी, पंचवटी) यास रुपये ५७ हजार रुपये त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील खात्यावर जमा केले. त्याने करणसह जवळपास ४७ विद्यार्थ्यांना बनावट विमान तिकिटे दिले. सदरचे तिकीट ऑनलाइन चेक केले असता ते खोटे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रतीक दादाजी पगार यांच्या घरच्यांची चौकशी केली असता तुमचे पैसे परत करू त्याची आई व लहान भाऊ यांनी सांगितलं. त्यासाठी ठाणे जनता सहकारी बँकेचा धनादेश देण्यात आला. दिनेश खैरनार यांनी हा धनादेश आपल्या खात्यात टाकला असता पैसे नाही म्हणून बँकेकडून परत आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *