नाशिक : प्रतिनिधी
राज्यात इंधनाच्या तुडवड्यामुळे भारनियमन करण्यात येत आहे. तर नाशिक शहरासह जिल्ह्यात आजपासून भारनियमनला सुरूवात झाली आहे. जिल्हयातील ग्रामीण भागात पाच तासांचे तर शहरात दीड तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. तर ए ते जी -3 अशी 9 विभागांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली आहे. या विभागानुसार भारनियमनाचा कालावधी ठरवण्यात आला आहे. या विभागांचे उपविभाग पाडताना त्यामध्ये आठवड्याच्या प्रत्येक दिवसानुसार वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. नाशिकचा समावेश ए विभागात असून, शहरात दीड तासाचे भारनियमन असेल.
कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्रात दररोज सरासरी दोन हजार मेगावाट विजेची तूट निर्माण होत आहे. परिणामी राज्यावर भारनियमननाची नामुष्की औढावली आहे.
असे आहे भारनियमन विभाग भारनियमनाचे तास
ए 1.30
बी 2.00
सी 2.30
डी 3.00
ई 3.30
एफ 4.00
जी -1 4.15
जी -2 4.30
जी -3 5.00