सिटीलिंकने विस्तारीत केली दोन मार्गांवरील बससेवा 

 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि . अर्थातच सिटीलिंकने दोन मार्गांवरील बससेवा विस्तारीत केली असून या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे . सोमवार दिनांक २५ एप्रिल २०२२ पासून या विस्तारीत बससेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे . नागरिकांची होणारी मागणी लक्षात घेता १ ) मार्ग क्रमांक १०१ वरील निमाणी ते बारदान फाटा असलेली असलेली बससेवा आता गंगापूर गावापर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे . त्यामुळे निमाणी ते गंगापूर गाव मार्गे सिव्हिल , सातपूर , अशोकनगर , बारदान फाटा असा नविन विस्तारीत मार्ग असून या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे . सकाळी ५.०० वाजेपासून २१.३० वाजेपर्यंत दर १० मिनिटांनी ही बससेवा उपलब्ध असेल . त्याचप्रमाणे २ ) मार्ग क्रमांक १०३ वरील निमाणी ते सिम्बॉइसेस दरम्यान असलेली बससेवा आता अंबड गावपर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे . निमाणी ते अंबडगाव मार्गे सिव्हिल , पवननगर , उत्तमनगर , सिम्बॉइसेस , अंबडगाव असा नविन विस्तारीत मार्ग असून या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे . सकाळी ६.०० वाजेपासून २१.३५ वाजेपर्यंत या विस्तारीत बससेवेचा लाभ घेता येणार आहे . शिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी दर १० मिनिटांनी या मार्गावर बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *