रेल्वे वॅगनमधून इंधन चोरी करणारी
रेल्वे कर्मचाऱ्यांची टोळी जेरबंद
मनमाड आरपीएफची कारवाई
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड नजीक असलेल्या पानेवाडी इंधन प्रकल्पातील रेल्वे वॅगन यारडात उभे असलेल्या इंधन टाक्यांमधून वॉल लिंक करून त्यातून पेट्रोल डिझेलची चोरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला मनमाड आरपीएफ च्या टीमने तरंगे हात अटक केली आहे यामध्ये काही मुद्देमाल व सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे
याबाबत सविस्तर वृत्ताचे की मनमाड येथील पानेवाडी इंदर प्रकल्पात रेल्वे व्हॅगनद्वारे पेट्रोल डिझेल ने आण करण्यात येते यासाठी रेल्वेतर्फे स्पेशल यार्ड तयार करण्यात आला असून या ठिकाणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पॉईंट्स मन काम करतात मात्र या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी या मधून पेट्रोल डिझेल चोरी करण्याचा तसेच ते बाहेर विकण्याचा मोठा धंदा चालू केला होता याबाबत अनेक तक्रारी होत होत्या मात्र याकडे कोणीही लक्ष देत नव्हते आरपीएफ यांना मिळालेल्या माहितीनुसार येथे धाड टाकली असता पेट्रोल डिझेल चोरी करताना सहा कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून अंदाजे किंमत = रु. 3276/-आणि 01 मोठा प्लास्टिक कॅन आणि 01 लिटर प्लास्टिकची बाटली एकूण अंदाजे 11 लिटर पेट्रोल ज्याची एकूण अंदाजित किंमत = रु 1124 आणि दोन्हींची एकूण किंमत = रु 4400/- 02 पंचांसह विकले गेले सदर चोरीमध्ये वाहतुकीसाठी वापरलेली 06 दुचाकी वाहने जप्त करून नमुने घेण्यात आले.यात प्रवीण सयाजी शिंदे, वय- 31 वर्षे, विभाग- ऑपरेशन्स (पॉइंट्समन)
अजय धूपसिंग यादव, वय- 24 वर्षे, विभाग- ऑपरेशन्स (पॉइंट्समन)गोकुळ कृष्ण सुरसे, वय ३४ वर्षे, विभाग- संचालन (पॉइंट्समन)सिद्धेश्वर उल्हास शहरकर वय 37 वर्षे वाणिज्य विभाग (CGC)शुभम लक्ष्मण तुरकणे, वय 28, विभाग C&W हेल्पर* पानेवाडी, रविद्र निवृत्ती आहेर, वय ४७, विभाग C&W ग्रेड प्रथम* पानेवाडी, वर नमूद केलेल्या ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर, त्यांच्या ताब्यातून पेट्रोल/डिझेल जप्त करण्यात आले आणि चोरीमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेच्या वाहतुकीसाठी वापरलेली 06 दुचाकी वाहने दोन न्यायाधीशांसमोर जप्ती पंचनामा अंतर्गत जप्त करण्यात आली. आणि सर्व आरोपींना RPF ने अटक केली त्यांना मनमाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे प्रत्येकाने दोन न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबूल केला आणि योग्य कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली या कारवाईत सहाय्यक. पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोमवंशी, हेडकॉन्स्टेबल विठ्ठल नागरे, कॉन्स्टेबल चतुर मासुळे, कॉन्स्टेबल नारायण बागुल आणि सीपीडीएसचे हेड कॉन्स्टेबल समाधान गांगुर्डे यांनी भाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस.यादव करीत आहे.