नाशिक जिल्ह्यात मतदानाचा उत्साह, सकाळपासूनच ठिकठिकाणी लागल्या रांगा

नाशिक जिल्ह्यात मतदानाचा उत्साह

सकाळपासूनच ठिकठिकाणी लागल्या रांगा

नाशिक – दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरळीतपणे सुरू झाले असून, बी. डी. भालेकर मैदान येथे असलेल्या केंद्रावर सकाळीच रांग लागली होती. नाशिक लोकसभा मतदार संघ मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर महायुतीचे हेमंत गोडसे, अपक्ष शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करणं गायकर हे उमेदवार आहेत, दिंडोरीत दहा उमेदवार असले तरी खरी लढत दुरंगी होत आहे, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासमोर नवखे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले भास्कर भगरे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी या भागात मोठा घटक आहे, नाशिक मध्ये महायुती चा उमेदवार उशिरा जाहीर झाला, महाविकास आघाडी ने वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली, परिणामी प्रचारात पण त्यांना आघाडी घेता आली, वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विराट सभा घेतली, त्यातुलनेत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री यांचा रोड शो सोडला तर कान्हेरे मैदानावर एकही सभा झाली नाही, गोडसे यांना मित्र पक्षातील काही घटकांची नाराजी दूर करता करता नाकी नऊ आले होते. ,तर शांतिगिरी महाराज, करण गायकर यांनी देखील जोरदार हवा निर्माण केली, त्यामुळे आता मतदार राजा काय करतो याबाबत मोठी उत्सुकता आहे.

मशीन बंद पडण्याचे प्रकार

सातपूर येथील जिजामाता शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 3 येथील मशीन सकाळी साडेआठ च्या सुमारास 10 मिनिटे बंद पडले होते. याच केंद्रावर मोठी रांग लागलेली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *