कुंदेवाडी येथे देवनदी बंधाऱ्यात दोघे बुडाले
सिन्नर : प्रतिनिधी
येथून जवळ असलेल्या कुंदेवाडी येथील देवनदी बंधाऱ्यांमध्ये दोन मुले बुडाल्याची प्राथमिक माहिती सिन्नर पोलीसांकडून देण्यात आली आहे.
उन्हाचा वाढती काहिलीमुळे सिन्नरच्या वावी वेस येथे असलेल्या आंबेडकर नगर परिसरात राहणारे सार्थक काळू जाधव (वय 14 ) व अमित संजय जाधव (वय 15) हे दोन मित्र कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. सिन्नर ग्रामीण पोलीस दाखल झाले आहे. स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्याचा मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.