नाशिक: प्रतिनिधी
तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना महावितरण विभागाचा उप कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले.किसन भीमराव कोपनर असे या लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून, पिंपळगाव बसवत येथे ते कार्यरत होते. दुकानाचे व्यावसायिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवत त्याठिकाणी इंडस्ट्रीज इलेक्ट्रिक मीटर बसवूनदेण्यासाठी1 लाख रुपये मागितले होते. लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.