क्षत्रबलाक  पक्ष्याला  संभाजीनगर येथे जीवदान; म्हसरूळ येथील टीटीसी सेंटर  येथे यशस्वी उपचार

क्षत्रबलाक  पक्ष्याला  संभाजीनगर येथे जीवदान
म्हसरूळ येथील टीटीसी सेंटर  येथे यशस्वी उपचार
नाशिक:  प्रतिनिधी

संभाजीनगर वनविभागातील दौलताबाद गावात क्षत्रबलाक नावाचा लहान पक्षी जखमी अवस्थेत संभाजीनगर वनविभागाचे कर्मचारी यांना मिळुन आला. सदर पक्षी वनकर्मचारी यांनी सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन प्राथमिक तपासणी करुन घेतली. त्यानंतर औरंगाबाद वनविभागातील कर्मचारी यांनी सदर पक्षी पश्चिम वनविभाग नाशिक येथील वन्यजीव अपंगालय केंद्र म्हसरुळ टी टी सी सेंटर नाशिक येथे पुढील उपचार करणेसाठी दाखल करण्यात आला.या पक्ष्यांवर उप वनसंरक्षक पश्चिम भाग, नाशिक पंकज गर्ग, व श्रीमती. सिमा मुसळे  टीटीसी नोडल अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली टी टी सी सेंटर येथील वैदयकीय अधिकारी  हेमराज सुखलाल यांनी   उपचार सुरू केले आहे.  पक्ष्यांचे रक्ताचे नमुने व एक्स रे करण्यात आले असुन त्यामध्ये वैदयकीय अधिकारी यांचे म्हणणेनुसार सदरच्या पक्ष्यास अॅनेमिया (रक्ताची कमतरता) व हायपो कॅल्शिमीय म्हणजेच (कॅल्शियमची कमतरता) असल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदरचा पक्षी अशक्त असल्याचे प्रथमदर्शनी वर्तविण्यात आले. तसेच सदर पक्षी कोठेतरी धडकल्याने त्यांचे पंखामधील हवेची पिंशवी फुटली असल्याने त्यास उडता येत नव्हते तदनंतर योग्य ते औषणौपचार केलेनंतर सदर पक्षी सदृढ झाला. त्यानंतर त्यांची फ्लाईंग टेस्ट करुन घेण्यात आली. सदर पक्षी पर्णपणे उडण्यास सक्षम झालेनंतर त्यास सुरक्षिरित्या संभाजीनगर वनविभागातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. असे वनपरिक्षेत्र अधिकारी शासकीय मालाचे विक्री केंद्र, म्हसरुळ तथा टीटीसी नोडल अधिकारी श्रीमती सीमा मुसळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *