गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी मूर्तीकार फिरतवताय गणेश मूर्तीवर अखेरचा हात….
मनमाड। प्रतिनिधी
:- गणेश चतुर्थीचा सण यंदा शनिवार, दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात डेकोरेशन आणि सजावटी सुरु करण्यास सुरुवात झालेली आहे. यंदा बाप्पाच्या आसनाची व्यवस्था कशी करायची कोणते डेकोरेशन करायचे, तसेच बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवायचा याची देखील तयारी सुरु आहे.मनमाड येथील सटाणे या ठिकाणी गणपती कारखान्यात रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्याची लगबग पाहायला मिळत आहे. येथील गणेशमूर्ती प्रचंड प्रसिद्ध आहेत. यंदा सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमतीत 10 ते 20 टक्के दर वाढ झाली आहे. मुंबई पुणे नाशिक प्रमाणेच मनमाडलाही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मनमाडला गणेश मूर्तीची आरस किंवा सजावट पाहाण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली असते. संपूर्ण दहा दिवसांत मनमाड संपूर्ण बाप्पाच्या भक्तीत लीन झालेले पाहायला मिळते. मनमाडला मानाच्या गणपतीची मिरवणूक आधी सुरु होते.
मनमाड शहरानजीक असलेल्या सटाणे येथे गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे या कारखान्यात आता जवळपास मूर्ती गणेश मूर्ती तयार झाल्या असुन त्यांच्यावर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे मागील वर्षी नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे आम्हाला मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते मात्र यावेळी चांगला पाऊस झाला असल्याने झालेला खर्च निघून आम्हाला दोन पैसे उरतील अशी आशा आहे असे मत मूर्तीकार मोरे यांनी व्यक्त केले आहे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे मात्र तरीही आम्ही तेच भाव ठेवले आहेत. गणेश मूर्ती यासह पोळा सण आहे या दिवशी पूजेसाठी लागणाऱ्या बैल जोडीची देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि तेच बनवण्याचे काम सुरू असुन तेदेखील अंतिम टप्प्यात आले आहे.एकुणच काय तर आगामी होणाऱ्या पोळा गणेशोत्सव यासाठी लागणाऱ्या मूर्ती तयार होऊन त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे.
मुर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य महागले…!
गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस यासह कलर काथ्या यासह इतर सगळ्या वस्तुच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत मात्र तरीही आम्ही तोटा खाऊन गणेश मूर्तीच्या किमती आटोक्यात ठेवल्या आहेत यामुळे घरगुती गणपती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मूर्ती च्या किंमतीत अजिबात वाढ केलेली नाही.यावर्षी पाऊस देखील चांगला झालेला आहे यामुळे यावर्षी दोन पैसे मिळतील अशी आशा आहे.
दीपक मोरे,मूर्तीकार
घरगुती आरास साहित्य महागले..!
गणेशोत्सव म्हटलं की बालगोपाल यांच्यासह आबालवृद्धांना देखील हवाहवासा वाटणारा सण गणेशोत्सव साजरा करतांना अनेकजण घरगुती स्थापना करताना देखील मोठ्या प्रमाणावर आकर्षक आणि सुबक अशी आरास आणि सजावट करतात मात्र वाढत्या महागाईचा फटका गणेशोत्सव साठी जी आरास बनवतात व सजावटीसाठी जे साहित्य लागते या सगळ्याना बसला आहे या सगळ्या वस्तुच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत मात्र तरीही नागरिकांचा उत्साह कायम असुन कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सव साजरा करणारच असल्याचे चित्र आहे.