नांदगाव मतदारसंघ पुढाऱ्यांसहित विकणे आहे , शेखर पगारची भावनिक पोस्ट व्हायरल…!

नांदगाव मतदारसंघ पुढाऱ्यांसहित विकणे आहे

शेखर पगारची भावनिक पोस्ट व्हायरल…!
मनमाड:  आमिन शेख

नांदगाव तालुका पुढाऱ्यांसहित विकणे आहे..? जो जास्तीत जास्त पैसा देईल त्याला आम्ही साथ देणार..? असा मजकूर असलेली पोस्ट लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांनी व्हायरल केली असुन नांदगाव तालुक्यात सध्या या सोशल मीडियावर व्हायरल पोस्टची चर्चा आहे.मुळात नांदगाव तालुका हा विकाऊ तालुका आहे अशी भावना जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील नेत्यांची झाली असुन याला कारण म्हणजे नांदगाव तालुक्यातील विकाऊ नेते आहेत यांना जनतेशी काही देणं घेणं नाही ते केवळ आपल्या स्वार्थासाठी कुणालाही मदत करतील यामुळे भविष्यात जर दाऊद इब्राहिमने नांदगाव तालुक्यात उमेदवारी केली तर नवल वाटू नये..? असा संतप्त सवाल देखिल पगार यांनी उपस्थित केला आहे.
या पोस्टबाबत शेखर पगार यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की नांदगाव मतदारसंघ कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या दुष्काळी परिस्थितीतून कोणीतरी येऊन आम्हाला बाहेर काढेल या आशेवर नांदगाव तालुक्यातील जनता जगत आहे मात्र 2009 साली अवघ्या 15 दिवसांत तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना आमदार केले ते केवळ आणि केवळ तालुक्यातील विकाऊ पुढारी यांच्या जीवावर त्यानंतर सलग दोनदा आमदारकी मिळवली तेही केवळ याच पुढाऱ्यांच्या जीवावर यानंतर आमदार सुहास कांदे यांनी तोच पॅटर्न वापरत तालुक्यातील सर्व विकाऊ पुढारी आपल्या तंबूत दाखल करत आमदारकी मिळवली आणि आताही त्याच धर्तीवर त्यांचे काम सुरू आहे याहीपेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे नांदगाव तालुक्यात उमेदवारी करण्यासाठी राज्यातील मोठ्या नेत्यांकडून या मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत असुन या मतदारसंघात कुणीही आमदार होऊ शकते फक्त तुमच्याकडे येथील नेते विकत घेता येईल एवढे पैसे पाहिजे याला कारण या तालुक्यातील जनता ही नेत्यांच्या मागे फिरणारी जनता आहे मात्र या लोकसभा निवडणुकीत जनतेने परिवर्तन घडवले आहे या वेळी जनतेने नेत्यांना घरचा रस्ता दाखवत स्वतः निर्णय घेऊन मतदान केले आहे यामुळे तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे ती या विकाऊ पुढाऱ्यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडत नाही म्हणून मी ही पोस्ट व्हायरल करून तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे नांदगावकर जागा हो परिवर्तनाचा धागा हो… असे आवाहन मी यापोस्ट द्वारे नागरिकांना केले आहे.भविष्यात जर पैसेच सर्व काही असेल तर कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिम हादेखील इथे येऊन आमदार होईल याला आपलेच तालुक्यातील पुढारी कारणीभूत ठरतील असेही पगारे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *