चालकाचे प्रसंगावधान
नाशिक ः प्रतिनिधी
मुंबई नाका येथे कार ने भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला.मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडली यावेळी कारमध्ये आर्किटेक्चर कॉलेजच्या चार मुली आणि चालक सहकारी होते.अचानक कारमधुन धूर येत असल्याचे पाहून चालकाने गाडी थांबवित सुरक्षीत बाहेर पडल्याने जीवीतहानी टळली.प्रत्यक्षदर्शीची गर्दी झाल्याने मुंबई नाक्यावर वाहतूक कोंडी झाली होती.घटनास्थळी अग्नीशामक दलाची गाडी दाखल होवून कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला.