म्हणे रिक्षा चालकाने लुटले … तपासात उघड झाले भलतेच

नाशिक : वार्ताहर

द्वारका येथील उड्डाणपुलावर एका प्रवाशाला रिक्षाचालकाने लुटल्याचा बनाव तक्रारदारानेच रचल्याचे समोर आले आहे. मद्याची व गांज्या ओढण्याची सवय आई वडीलांना कळेल, म्हणून तक्रारदारानेच हा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले यांनी सांगितले.
रिक्षात बसलो असताना एका रिक्षा चालकासह त्याच्या तीन मित्रांनी बेदम मारहाण करीत रोकड व नवीन मोबाइल हिसकावून नेल्याची घटना मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवारी रात्री घडली होती. याप्रकरणी अभिनेष जगन्नाथ गुप्ता (35, रा. भांडुप, मुंबई) याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान, मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला. त्यात तक्रारदार गुप्ता हा नशेत असल्याचे पोलिसांना माहिती मिळवण्यात व तपासात अडचणी आल्या. सीसीटीव्ही व त्याने खेरदी केलेल्या नवीन मोबाइलची माहिती कळताच पोलिसांनी मोबाइल दुकानात तपास केला. त्यात तक्रारदार आढळून आला नाही. तसेच त्याने पूर्वी दिलेली माहिती व नशा उतरल्यानंतर दिलेल्या माहितीत तफावत आढळली. तसेच गुप्ताच्या खिशात 1200 रुपये रोख सापडले आहे. तरीही पोलिस यासंदर्भात सखोल तपास करत असल्याचे राहोकले यांनी सांगितले. तसेच गुप्ताच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या नसल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *