मनमाडला एसटीचा चक्का जाम

मनमाडला एसटीचा चक्का जाम

महाराष्ट्र कृती समितीचे धरणे आंदोलन डेपो बंद; प्रवाशांचे हाल

मनमाड : आमिन शेख

आजपासून लालपरी अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरु केले असुन विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आत आमच्या मागण्या कराव्यात अन्यथा आम्ही कामांवर रूजू होणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केले असुन महाराष्ट्र कृती समिती मनमाडचे सर्व कर्मचारी यात सहभागी झाले आहेत यामुळे आगार पूर्णपणे बंद पडले आहे.

एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्यांची सोडवणूक तातडीने व्हावी यासाठी  दि २ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यभर उग्र निदर्शने झाली तर उद्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. २ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ः३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने व द्वारसभा आयोजीत केली होती  यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला होता मात्र यावर काहीच तोडगा निघाला नाही यामुळे. तीन सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९/- कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या ५०००/-, ४०००/-, २५०० ऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
१. खाजगीकरण बंद करा.

२. सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.

३. इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.

४. जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.

५. चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या

६. वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.

७. सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी..

८. विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.

या व इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आजपासुन एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *