राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार

केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस
काजी सांगवी : वार्ताहर

चांदवड येथे डॉ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन केदा नाना आहेर यांना उमेदवारी मिळावी या साठी मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे. मागणीला वरीष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दिला आहे.  महायुतीकडून ही जागा भाजपाला मिळाल्या नंतर महायुतीचे उमेदवार केदा नाना आहेर  असणार हे या प्रसंगी डॉ राहुल आहेर यांच्या कडुन घोषित करण्यात आले   गेल्या 10 वर्षात केदा नानांनी मोठे मन करून मला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे या वेळेस केदा नाना यांना संधी देण्यात आली असे या प्रसंगी नमूद करण्यात आले आहेर कुटुंब गेल्या 40 वर्षा पासून राजकारणात आहे आमचे कुटुंब सतत एकत्र राहून निर्णय घेते त्यामुळे राजकारणा पलीकडे पण कुटुंब व्यवस्था आहे. ती टिकली पाहिजे तसेच या विधांसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येऊन सत्ता महायुतीला मिळावी या साठी किती पण त्याग करायला तयार आहे असे या प्रसंगी नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *