रश्म शुक्लाची तातडीने बदली.. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला या वादात सापडल्या होत्या, ठाकरे गटाने त्यांच्याबद्दल आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. आज निवडणूक आयोगाने त्यांना तडकाफडकी हटवले आहे.