श्रमिकनगरला दिवाळीच्या ऐन सणासुदीत समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्या

श्रमिकनगरला दिवाळीच्या ऐन सणासुदीत समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्या

सातपूर प्रतिनिधी

शहरातील श्रमिकनगरच्या हंसनगरी परिसरात आज पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने दोन मोटरसायकल जाळल्याने परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान,घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे.यामध्ये स्थानिक रहिवासी असलेले बाळासाहेब पवार आणि त्यांचा मुलगा सागर पवार यांची MH15FF8882 आणि
MH15AT4788 या दुचाकीचा समावेश आहे.

या घटनेची माहिती कळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे. तरी श्रमिकनगर परिसरात ऐन दिवाळीच्या सणासुदीत अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे..
ज्या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ झाली त्याच ठिकाणाहून मागील महिन्यात काही आरोपींच धिंड काढली होती,
सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून सातपूर पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *