पारा @ ६.७; द्राक्षपंढरी गारठली

पारा ६.७ अंशावर
द्राक्षपंढरी गारठली
निफाड। प्रतिनिधी
गत सप्ताहात ढगाळ‌ हवामान अन पाऊसाने निफाडच्या द्राक्षपंढरीला हैराण केले होते मात्र सोमवार दि ९/१२/२०२४ रोजी निफाडचा पारा ६.७ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे
पारा घसरत असल्याने पाणी उतरत असलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवाय द्राक्षवेलीच्या विकास खुंटणार असल्याने पुरेसे पाणी देणे अथवा शेकोटी पेटविणे यासारखे उपाय द्राक्ष बागाईतदारांना करावे लागणार आहेत
गहु हरभरा कांदा या रब्बी हंगामातील पिकांसाठी मात्र थंड हवामान पोषक असल्याचे तज्ञ व अनुभवी शेतकर्यांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *