ओझरला शस्राने वार करुन युवकाचा खून

ओझरला शस्राने वार करुन युवकाचा खुन

ओझर पोलिसांनी केला खुनाचा गुन्हा दाखल

ओझर : प्रतिनिधी

आज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी कारणावरून आज्ञात व्यक्तीने एका तरुणाच्या छातीवर धारदार शस्राने वार करुन त्यास जिवे ठार मारुन खून केला असल्याची घटना ओझर येथे घडली आहे दरम्यान ओझर येथे खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव शांततेत सुरु असताना यात्रेच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे
काल सोमवार दिनांक ९ रोजी सांयकाळी साडसहा ते रात्री ११वाजेच्या दरम्यान ओझर येथील जुन्या बस स्टँड वर अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी आज्ञात कारणावरुन कुठल्यातरी धारधार हत्याराने तुषार शिवाजी कडाळे, वय-26 वर्षे, धंदा मजुरी, सध्या राहाणार भेंडाळी ता. निफाड याचे छातीवर वार करुन त्यास जीवे ठार मारले अशी तक्रार मयत तुषारचा भाऊ गोरख शिवाजी कडाळे राहाणार 16 नंबर चारी, सोनवणे मळा, बाणगंगानगर ओझर. याने नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असुन ता संदर्भात अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *