उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द
नेमके काय कारण घडले?
नाशिक: प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज होणारा नाशिक दौरा अचानक रद्द झाला आहे. अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर येणार होते, त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक होणार होती. तसेच एका लग्नाला हजेरी, घोटी येथे रुग्णालयाचे उदघाटन व नाशिकच्या गंगापूर रोड येथील एका हॉटेल चे उदघाटन देखील होणार होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द झाल्याने सर्व तयारी वाया गेली आहे.