दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक

 

कळवण : प्रतिनिधी अभोणा येथील पोलीस हवालदार रमण काशीराम गायकवाड ( वय ४८ ) यांना काल ( दि . ५ ) दुपारी अभोणा पोलीस ठाणे आवारात तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्यात झालेले भांडण कोर्टात न जाऊ देता , परस्पर पोलीस स्टेशनमध्ये मिटविण्यात आली होती . यावरून पोलीस हवालदार रमण गायकवाड यांनी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून प्रत्येकी १ हजार याप्रमाणे एकूण २ हजार रुपयांची लाच मागितली होती . तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमनाद्वारे सदर कारवाई करण्यात आली आहे . विभागाकडून झालेल्या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे , पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील , राजेंद्र गिते , शरद हेंबाडे , परशुराम जाधव यांनी सापळा पथक म्हणून कामगिरी बजावली आहे . तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी , कर्मचारी यांनी काम करून देण्याच्या निमित्ताने पैशांची मागणी केली असेल तर लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्र . १०६४ अथवा ०२५३-२५७५६२८ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *