अंधश्रद्धा निर्मूलन , जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी होणार समाजकल्याणतर्फे आज एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

नशिक :प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला असून , या कायद्याच्या प्रचार प्रसिद्धी व अंमलबजावणीसाठी राज्याच्या समाजकल्याण विभागाने पुढाकार घेतला असून , विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . आज शुक्रवार दि .6 मे रोजी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे . पुणे येरवडा येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी श्याम मानव , सहअध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसिद्धी समिती यांचे मार्गदर्शन लाभणार आहे . यावेळी या समाजकल्याण विभागाचे सचिवसुमंत भांगे व आयुक्त प्रशांत नारनवरे हे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ शासनाने पारित केला आहे . त्याअंतर्गत विविध समित्या शासनाने गठीत केल्या असून , कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रचार प्रसिद्धी समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीच्या वतीने समाजकल्याण विभागातील संपूर्ण राज्यात कार्यरत असणारे अधिकारी यांच्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *