नाशिक: प्रतिनिधी
मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे काही केले नाही,यामुळे माझी विनाकारण बदनामी झाली. माझ्यावर खोटे आरोप झाले. त्यामुळे मी माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समृद्धी कृषी योजनेची घोषणा केली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर तोफ डागताना त्यांना कोर्टात खेचणारअसल्याची माहिती दिली. विधानभवनात काय करावे, कसे वागावे मला कळते, मी 25 वर्षांपासून सभागृहात आहे, मी सर्व नियम पाळतो, कृषी विभागात 52 जी आर काढले मी कोर्टात जाऊन स्वतःच या सर्व प्रकरणाशी संबंधित चौकशी करण्याची मागणी करणार आहे, माझा मोबाईलचे सर्व डिटेल्स देणार आहे, यात जर दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात एकसेकंद ही लावणार नाही, लगेच राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईल. असे कोकाटे म्हणाले. पण ज्या विरोधकांनी माझी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.