*ग्लायडिंग कोर्स दरम्यान शिगवे बहुला येथे ग्लायडर कोसळले; जीवितहानी टळली
देवळाली कॅम्प :
देवळाली येथील लष्करातील विंड रायडर्स या युनिटच्या ग्लायडिंग कोर्सदरम्यान शिगवे बहुला येथे अपघात झाला. प्रशिक्षणादरम्यान एक ग्लायडर नियंत्रण सुटल्याने थेट गावातील एका घरावर कोसळला.
या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तथापि, खाली कोसळलेल्या जवानाला दुखापत झाल्याने त्याला तत्काळ लष्करातील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मुरलीधर भिका चव्हाण, पोलीस हवालदार चंद्रभान श्रावण भोईर, होमगार्ड राजेश मधुकर राऊत व सागर गोविंद काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लष्करी अधिकाऱ्यां कडून या घटनेचा तपास सुरू असून गावात भीतीचे वातावरण पसरले असले तरी मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.