नांदगाव हादरले; १९ वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलावर वारंवार बलात्कार

नांदगाव तालूका हादरला १९ वर्षीय नराधमा कडून अल्पवयीन मुलांवर वारंवार बलात्कार

नांदगाव : आमिन शेख

– नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ १९ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलांवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचे नाव राजा रावसाहेब बागुल असे असून, त्याने निर्लज्जपणे कबुली देत ‘आता तुझ्या मुलीवर बलात्कार करीन’ अशी धमकीही दिली आहे आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असते त्याला न्यायालयिन कोठडी सूनवण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १९ वर्षीय आरोपीने सहा वर्षीय मुलावर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३७९/२०२५ दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३५१(२)(३) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, १२ अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायलयिन कोठडीत सुनावण्यात आली आहे.या घटनेने नांदगाव तालुका हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील बढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *