
किरण विष्णू सानप

नंदा किरण सानप
निमगाव-सिन्नरच्या घटनेने खळबळ; डोक्यात हातोडीने प्रहार
सिन्नर : प्रतिनिधी
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना तालुक्यातील निमगाव – सिन्नर येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेत नंदा किरण सानप (वय 34) या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेनंतर फरार झालेला संशयित किरण विष्णू सानप (वय 38) यास मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली आहे. निमगाव-सिन्नरच्या टेकाडे वस्ती शिवारात राहणारे मद्यपी किरण विष्णू सानप आणि पत्नी नंदा किरण सानप यांच्यात नेहमीच खटके उडत होते. मंगळवारी (दि.2) सकाळी 11 वाजेच्या सुमारास किरण सानप याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने ते देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तो तिथून गावात आला.