मनोज जरांगे पाटील यांचा नाशिक सकल मराठा समाजाकडून सत्कार

नाशिक : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करत निःस्वार्थी लढा देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये नाशिक सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी तब्येतीची विचारपूस करून, मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, मुंबईत झालेल्या ऐतिहासिक विजयामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या दिशेने मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभा राहील आणि या न्यायाच्या लढ्यात ठामपणे सहभागी राहील, असा निर्धारही यावेळी सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, नानासाहेब बच्छाव, केशव अण्णा पाटील, नितीन सुगंधी, विलास पांगरकर, ज्ञानेश्वर थोरात, निखिल पांगरकर आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *