सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर अपघातात तिघांचा मृत्यू

मृतांत दोघा भावांचा समावेश

सटाणा : प्रतिनिधी
साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर वनोली फाट्याजवळ बस व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांत दोघा सख्ख्या भावाचा समावेश आहे.
गोविंदा काळू पवार (वय 38), विकास दयाराम माळी (19), रोशन दयाराम माळी (वय 28, रा. सुकडनाला, सटाणा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सटाण्याकडून मोटरसायकलनेे (एमएच 41-बीएस 4124) ताहाराबादच्या दिशेने जात असलेल्या तिघा तरुणांचा आणि सटाणा दिशेने येणारी नंदुरबार-वसई एस.टी.बस (एमएच 14 -एलएक्स 8849) यांच्यात वनोली फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मोटर सायकल वरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा करत अपघातग्रस्त वाहने पोलीस स्थानकात आणण्यात आली. पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निंबा खैरनार, योगेश पवार, नितीन जगताप, बाळासाहेब टिळेकर, सिकंदर कोळी पुढील तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *