गुंडाविरोधी पथकाची यशस्वी कारवाई
सिडको विशेष प्रतिनिधी :- देवळाली कॅम्प येथील बुखारी हॉटेलजवळ, दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या प्रेम थोरात या सराईत गुन्हेगाराला अखेर गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे.
या घटनेत फिर्यादी आदित्य भालेराव व त्याच्या मित्रावर जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकाला आरोपीला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तपोवन परिसरात सापळा रचून, प्रेम गोपाल थोरात (वय 20, रा. हाडोळा, आनंद रोड, देवळाली कॅम्प) याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय गांगुर्डे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनिल आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले व सुनीता कवडे यांनी केली.