उद्धव निमसे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, पोलिसांच्या तपासावर कोर्टाचे ताशेरे

नाशिक: प्रतिनिधी

नांदूर नाका येथील राहुल धोत्रे खून प्रकरणातील संशयित आरोपी, माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला. राहुल धोत्रे खून प्रकरणांत गुन्हा दाखल झाल्यानंतर निमसे हे फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार केली, त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात असला तरी ते अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचे शेवटचे लोकेशन पेठ रोडवर आढळले होते असे बोललं जात आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न केला. आज सुनावणी झाली असता कोर्टाने तपासावर ताशेरे ओढत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *