नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे सामूहिक शंखनादाच्या निनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झालेे. गोदावरीच्या तीरावर एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला. (छाया : किशोर वडनेरे)
A vibrant atmosphere along the banks of the Godavari, brought about by the collective blowing of conch shells.