वणी येथील किराणा दुकानातून सात लाखांचा माल लंपास

वणी : प्रतिनिधी
वणी-पिंपळगाव रस्त्यावरील किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचा किराणामाल लंपास केल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की वणी पिंपळगाव रस्त्यावर खाबिया बाजार हे किराणा दुकान आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर केव्हातरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेली खिडकी तोडून दुकानात आतमध्ये प्रवेश करून सुमारे 7 लाख 41 हजार रुपयांचा किराणा माल यामध्ये तेलाचे डबे , शेंगदाणे पोते, जिरा पोते, बिडी पोते, काजू, बदाम, सिगारेट, खोबरेल तेल, खजूर आदींसह सुमारे सात लाखांचा किराणामाल लांबविला आहे. वणी पिंपळगाव रस्ता हा रहदारीचा असून, अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याने व्यापारी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात चोरट्यांचा पोलिसांनी तपास करावा व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी वणी पोलिसांकडे केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *