येवला : प्रतिनिधी : शहरातील वल्लभ नगर येथे राहणा – या एका युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नांव विशाल उर्फ सोनु रामदास गायकवाड (वय 25)याने आईशिवाय जीवन जगू शकत नाही असे एका वहीच्या पानावर लिहून ठेऊन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत वीशाल उर्फ सोनु रामदास गायकवाड या तरूणाच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. आईची तो सातत्याने आठवण काढीत होता . आईचे निधन झाल्यापासून तो तणावात जीवन जगत होता . तणावग्रस्त अवस्तेतच त्याने आत्महत्या केली . याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये असे वहीत लिहुन ठेवले .
सोनु उर्फ विशालच्या आत्महत्या बद्दल येवलावासियांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकर अशी कि येवला शहरातील वल्लभनगर येथे राहणारा विशाल उर्फ सोनु रामदास गायकवाड यांने आपण आपल्या आई बिगर जीवन जगु शकत नाही असे एका वहीच्या पानावर लिहुन ठेऊन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . व्यक्त केली आहे . या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस हवालदार गांगुर्डे , पोलिस हवालदार शिरूड करीत आहे .