महाबळेश्वर पेक्षाही हे शहर अधिक थंड, पारा इतक्या अंशांवर

निफाड : तालुका प्रतिनिधी

गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील तापमानात मोठी घट होत असून रविवार दिनांक७रोजी ११अंश नोंदवले गेलेल्या तापमानात मोठी घट झाली असून आज सोमवार दिनांक ८रोजी निफाड कृषी संशोधन केंद्रावर ६.४अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका थंडीने गारठू लागला असून .पुढील काही दिवस तालुक्यात थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत, यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाची सुरू झालेली हजेरी ऑक्टोबर पर्यंत कायम राहिल्याने हातात आलेली पिके वाया गेली ,तर भरवश्याचे असणाऱ्या द्राक्ष वेलींना यावर्षी फळधारणा झाली नाही. तर जेथे द्राक्षवेलीना थोडेफार घड आले त्यांना आता या प्रतिकूल हवामानाचा सामना कराव लागत आहे.वाढत्या थंडीमुळे द्राक्ष वेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रतिक्रिया मंदावत असून . मुळ्या चोकअप होणे,वेलींवर भुरी ,डाऊनी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.त्यामुळे द्राक्ष पीक वाचविण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे द्राक्षबागेत, चिपाटे पेटवून उष्णता तयार करू लागले असून.द्राक्ष वेलींच्या मुळ्या चोकअप होऊ नये यासाठी शेतकरी ठिबक द्वारे पाणी देत आहेत, सध्या तालुक्यात उन्हाळ कांदा रोप ऐन बहरात आली असून ही वाढती थंडी कांदा पिकाबरोबरच गहू हरभरा पिकासाठी लाभदायक ठरत आहे, मात्र थंडीत अधिक वाढ झाली तर कांदा पात करपणे.गहू आडवा पडणे,असे प्रकार वाढीस लागण्याची शक्यता अधिक आहे, तालुक्यात सर्वाधिक थंडीचा माहोल तालुक्याच्या गोदाकाठ भागात दिसून येत आहे.आणि विशेष म्हणजे या परिसरात ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने ऊसतोडणी कामगार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत साहजिकच वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी वाडी, वस्तीवर शेकोट्या पेटविल्या जावू लागल्या आहेत, ……. , . महाबळेश्वर . कुलू मनाली पेक्षाही कुल कुल जिल्ह्याचा कॅलिफोर्निया मधून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी थंडी नवनवे विक्रम प्रस्थापित करीत असते, मात्र दरवर्षी ही थंडी डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस पडते.यावर्षी मात्र नोहेंबर महिन्याच्या सुरवातीलाच थंडीचा माहोल सुरू झाल्याने .डिसेंबर अखेर थंडी वजा डिग्री सेल्सिअस मध्ये नोंदविली जाईल की काय अशी शंका घेतली जात आहे.कारण पाच वर्षापूर्वी तापमानाची नोंद वजा मध्ये झाली होती. त्यावेळी पाण्याचे बर्फात रुपांतर तर पिकांची पाने करपली होती,द्राक्षबागेत काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली होती.त्यामुळे अशी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे, निफाड तालुक्यात शीतलहार गेल्या आठ दिवसापासून सायंकाळच्या वेळेस तालुक्यात शितलहर सुरू झाल्याने थंडीत वाढ होत आहे,, काल सोमवारी निफाड कृषी संशोधन केंद्रावर ६.४अंश तापमान नोंदविले गेल्याने काल सर्वाधिक थंडीचा माहोल दिसून आला , तालुक्याचे गोदाकाठ भागात दरवर्षीच सर्वाधिक थंडी जाणवते सध्या ,ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र याच परिसरात असून सध्या साखर कारखान्याच्या हंगाम सुरू असल्याचे कोपरगाव, कोळपेवाडी द्वारकाधीश.कादवा,रानवड,कादवा गोदा शुगर या कारखान्याचे ऊस तोडणी मजूर डेरेदाखल झाले असून त्यांचा सहकुटुंब सहपरिवार मुक्काम याच परिसरात असून .बैलगाडीने आलेल्या या मजुराना या थंडीची सर्वाधिक झळ सहन करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *