डॉ. अब्दुल कलाम विज्ञाननगरी गजबजली
निफाड : तालुका प्रतिनिधी
पालखेड येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे भव्य गणित, विज्ञान व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्तीनाना थेटे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर पालखेडच्या उपसरपंच सुनीता कोकाटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश थेटे, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष विजय आहेर, ग्रा.पं. सदस्य नवनाथ कोकाटे, संतोष आहेर, राजेंद्र आहेर, योगेश होलगडे, गणेश थेटे, महसूल अधिकारी देवेंद्र लोढा, वि.वि.का. सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर जाधव, बाळासाहेब बंडू थेटे, माजी मुख्याध्यापक दत्ताराम थेटे, स्कूल कमिटी सदस्य अशोक शिंदे, मंगेश छाजेड, माधव खैरे, भाऊसाहेब शिंदे, सुनील थेटे, रावसाहेब शिंदे, विलास थेटे, संजय थेटे, अतुल महाले, समाधान थेटे, सागर कोकाटे, बाळासाहेब थेटे, केशव खैरे, गणपत हिरे, नाना भोगे, सागर निरभवणे, भारत हिरे, अतुल केदारे, मंगेश हिरे, त्र्यंबक भोई, किरण आहेर, सुरेश चारोस्कर, सुभाष घोलप, संदीप गांगुर्डे, पप्पू थेटे, केंद्रप्रमुख शोभा सावकारे, मुख्याध्यापक अशोक शेळके, परीक्षक राजाराम वाबळे, कविता जाधव आदी मान्यवर
होते. सदर प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 10वीच्या 115 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर प्रदर्शनाच्या आयोजनामुळे विद्यार्थांतील सुप्तगुणांना वाव मिळून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत झाला. यात विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक मांडणी तसेच वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त, योग्य सादरीकरण तसेच प्रदर्शनात लक्ष वेधून घेणारे अनेक वैज्ञानिक उपक्रम विद्यार्थ्यांनी बनविलेले होते.
प्रदर्शन शाळेच्या भव्य मैदानावर मोठ्या स्वरूपात भरविण्यात आल्यामुळे जणू काही शाळा हि विज्ञान नगरीच झाल्याचा भास होत होता,यामुळे विद्यार्थांतील सुप्त गुण बाहेर पडण्यास मोठी मदत झाली असून यावेळी परिसर गजबजला होता.सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनंदा दुर्दवळे, मंगेश कागदे, शैलेश शिखरे, राजेंद्र नाठे आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले, प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
लक्षवेधी असलेली उपकरणे
पाण्याचा धबधबा, जलशुद्धीकरण, बोट, गवत कापणी यंत्र, स्थितीक विद्युत, ग्रीन हाउस, होम मेड कूलर, विमान, कुटी यंत्र, पाण्यात जळणारा दिवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ज्वालामुखी सूचक, प्लास्टिक रियुज, भूकंप संदेश यंत्र, सोलर सायकल, हवेच्या दाबावर चालणारे रॉकेट, बलून रॅकेट, स्मार्ट व्हिलेज, वॉटर अलार्म, प्रदूषण दर्शविणारी उपकरणे, पाणीबचत संकल्पना, अपारंपरिक ऊर्जास्रोत, पवनचक्की, अशा अनेक प्रकारचे उपयोगी असणारे साधारणतः 115 पेक्षा अधिक वैज्ञानिक उपक्रम मांडण्यात आले होते.