पत्नीचा खून करणारा संशयित पती जेरंबद

नामपूर : वार्ताहर
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात शीतल नितीन भामरे (वय 26, रा. पंचवटी, नाशिक) हिचा चारित्र्याच्या संशयावरून पती नितीन भामरे याने गळा आवळून खून केल्याची घटना नुकतीच घडली होती.
बागलाण तालुक्यातील रामतीर येथील मृत शीतलची नातेवाईक पूनम बबन देसले यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ज्या दिवसापासून पत्नी मृत झाली तेव्हापासून पती नितीन भामरे नाशिकमधून फरार होता. संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना मिळताच त्यांनी शिताफीने त्याला शोधून अटक केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *