नाशिकमध्ये घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी

सिडकोतील राजीवनगर परिसरातील कल्पवन अपार्टमेंटमध्ये घरफोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फिर्यादी समीर पुरुषोत्तम नाईक यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर होते. घरात परत आल्यावर त्यांनी मुख्य दरवाजाचा लॅच तोडलेले पाहिले. चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये दोन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाची हिरा असलेली अंगठी, दोन सोन्याच्या रिंग, तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. एकूण मालमत्तेचे मूल्य अंदाजे 82 हजार रुपये आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गारले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *