21 नाटकांचे सादरीकरण, 30 जानेवारीला पारितोषिक वितरण
नाशिक : प्रतिनिधी
एक्काहत्तराव्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीस 30 डिसेंबरपासून सुरुवात होऊन ती दि. 29 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. सायंकाळी 6 ते 9 परशुराम साईखेडकर नाट्यगृहात महोत्सव होणार आहे.
या महोत्सवात 21 नाट्यप्रयोग होतील. कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य महोत्सवास प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कामगार कल्याण भवन, सातपूर कॉलनी, नाशिक येथे होईल.
सादर होणारी नाटके अशी ः
दि. 30 डिसेंबर- आश्रित (गांधीनगर वसाहत), 31 डिसेंबर 2025- जुगाड द गोळायुग (ल.क.भ.जळगाव वसाहत). 2 जानेवारी 2026-दानव (का. क. केंद्र, दीपनगर, भुसावळ), 5 जानेवारी- एक रिकामी बाजू- का. क. केंद्र नेहरूनगर, 6 जानेवारी- आगंतुक (का. क. केंद्र, जोशी कॉलनी, जळगाव), 7 जानेवारी- कज्जा (ल.क.भ सिडको वसाहत), 8 जानेवारी- मन वढाय वढाय (का. क. भवन, सातपूर), 9 जानेवारी- झेंडा रोविला (का. क., पिंप्राळा), 12- एक्सपायरी डेट (का. क. मालेगाव), 13- काळाच्या पंजातून (का. क. विहितगाव वसाहत), 14- नेबर प्लंबर आणि ती (का.क. केंद्र, अहिल्यानगर), 15- द कॅटॅलिस्ट (का. क. केंद्र, ओझर), 16- चार भिंतीचे घर (का. क. केंद्र, देवळालीगाव), 19- सुपारी (का. क. केंद्र, चितोड रोड, धुळे), 21- मालकीण मालकीण दार उघड (का. क. केंद्र. सिन्नर), 22- गुंता (ल.क.भ., जळगाव), 23 जानेवारी- वो फिर नहीं आते (का. क. केंद्र, संगमनेर), 26- प्रतिषिद्ध (सिडको), 27- शिनेमा (का. क. भवन, सातपूर वसाहत), 28- गंमत असते नात्याची (का. क. केंद्र, बुधवार पेठ), 29 जानेवारी 2026- दो लफ्जोंकी कहाणी (का. क. केंद्र, एकलहरे).
The preliminary round of the 71st Maharashtra Workers Welfare Board Theatre Festival begins from December 30th