फ्लोमीटर बसवण्यासाठी शट डाउन
नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लॉमीटर बसविण्याच्या कामाबरोबरच शहरातील पाणीपुरवठा देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. याकरिता उद्या शनिवारी (दि.20) शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा खंडित असणार आहे. तर रविवारी (दि.21) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
यानुसार नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्र.15 मधील द्वारका व गोडेबाबा जलकुंभ भरणारी 500 मी.मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीवर एम. एस. बँडचे काम केले जाणार आहे. प्रभाग क्र.23 मधील सुचितानगर जलकुंभ येथे एअर व्हॉल्व्ह दुरुस्त करणे, प्रभाग क्र.16 मधील गांधीनगर जलकुंभ येथे 700 मी.मी. व्यासाचे दोन व्हॉल्व्ह दुरुस्त करणे. तसेच 100 मी.मी. व्यासाचा एक एअर व्हॉल्व्ह दुरुस्त करणे व 500 मी. मी. व्यासाच्या पाइपलाइनवर लिकेज काढण्याचे काम, नाशिकरोडमधील प्रभाग क्र. 21 मध्ये मुक्तिधाम जलकुंभाजवळील कुलकर्णी पंपाची 300 मी.मी. व्यासाची एम. एस. पाइपलाइन मोठ्या प्रमाणात गळती असल्याने दुरुस्ती करणे, 600 मी. मी. व्यासाच्या पाइपलाइनवरील फ्लोमीटरची गळती दुरुस्ती करणे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत प्रभाग क्र. 21 मध्ये मुक्तिधाम जलकुंभाजवळील कुलकर्णी पंपाची 300 मी.मी. व्यासाची इनलेट लाइनवर व्हॉल्व्ह बसविणे, प्रभाग क्र. 21 मध्ये दुर्गा जलकुंभ येथील स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत इनलेट व आऊटलेट लाइनवर व्हॉल्व्ह बसविणे तसेच फ्लोमिटर बसविले जाणार आहे. पेठरोड सप्तरंग सोसायटीजवळ मखमलाबाद 600 मी. मी. व्यासाच्या उर्ध्ववाहिनी वर अमृतगार्डन, तवली डोंगरला जाणार्या उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. पंचवटी जलशुद्धीकरण आवारातील नवीन 15 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभांच्या मुख्य वितरण वाहिनीवर आरपी जलकुंभाच्या उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. निलगिरी बाग जलशुद्धीकरण आवारातील 20 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या मुख्य वितरण वाहिनीवर कैलासनगर, संभाजीनगर रोड, गंगापूर डावा तट कालवा परिसरास पाणीपुरवठा सुधारणा करण्याकामी 300 मी. मी. व्यासाच्या मुख्य वितरण वाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. प्रभाग क्र. 26 मधील अंबड लिंकरोड म्हसोबा मंदिरामागे ले रिगालिया बिल्डिंग रस्ता येथील 500 मी.मी. व्यासाची पाइपलाइन टाकणे, प्रभाग क्र. 26 मधील चुंचाळे शिवार मारुती संकुल ते घरकुल रस्ता 400. मी.मी. व्यासाच्या पाइपलाइनचे लिकेज काढणे, सातपूर, पिंपळगाव बहुला शिवारातील खांडकी रस्ता 1000 मी.मी. व्यासाच्या पाइपलाइनचे लिकेज काढणे,
प्र.क्र. 8. कॅनॉल रस्ता संत कबीरनगर 500 मी.मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे, प्र.क्र. 8, गणेशनगर जलकुंभाजवळ 500 मी. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे, प्र.क्र. 09 ध्रुवनगर गुलमोहर कॉलनी 1200 मी. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे. प्र.क्र. 09 कार्बन नाका संदीप क्लासिक कंपनी भिंतीलगत 500 मी. मी. पीएससी लाइनचे लिकेज काढणे प्र.क्र. 08 भोसला मिलिटरीजवळील 500 मी.मी. पीएससी लाइनचे व्हॉश आऊट व व्हॉल्व्ह लिकेज बंद करणे. अमृतमणी जलकुंभ येथील इनलेट व्हॉल स्मार्ट सिटी कंपनी बसविणे. प्र.क्र.26 मधील दत्तनगर पाण्याची टाकी येथे इनलेट व्हॉल्व्ह बसविणे, चुंचाळे पंपिंग इनलेट, आऊटलेट दोन्ही व्हॉल्व्ह बसविणे आदींसह कामे केली जाणारा आहेत. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
Water supply to be disrupted throughout the day tomorrow; low pressure on Sunday