नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने परराज्यातून चोरट्याा मार्गाने येणार्या अवैध विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे दि. 22 डिसेंबरला करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या गस्तीत महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनावर संशय आल्याने झडती घेतली असता, वाहनात दादरा- नगर हवेली व दीव-दमण येथे विक्रीसाठी आणलेले 75 बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मद्याचे बाजारमूल्य अंदाजे 12 लाख 44 हजार 320 रुपये आहे.
वाहनचालक मनोज जयदेव पाटील याला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या आदेशानुसार सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक रियाज खान व विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक आर. व्ही. चव्हाण आहेत. या कारवाईत जवान दिलीप पांडुरंग नागरे, राजाराम सोनवणे, विकास गायकवाड, राहुल भगत, संकेत ताठे यांनी सहभाग घेतला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे की, जप्त केलेले मद्य महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने आणले जात होते आणि आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
Stock of illegal foreign liquor seized in Nashik