नाशिक : प्रतिनिधी
मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजर्या केल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर टाटा टी प्रीमियम देशाचा चहा या टाटा टीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमधील आघाडीच्या ब्रँडने पुणे आणि औरंगाबादमध्ये अतिशय अनोख्या व शानदार महिला शोभायात्रेचे (बाईक रॅली) आयोजन केले होते.
स्थानिक परंपरा, संस्कृती आणि स्थानिक वैशिष्ट्यांचा सन्मान करण्याच्या आपल्या ब्रँड धोरणाचे पालन करत टाटा टी प्रीमियमने मराठी महिलांच्या ‘सर्वगुणी’ व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणारा हा उपक्रम हाती घेतला होता.
या शानदार शोभायात्रेमध्ये दोन्ही शहरांमध्ये 300 पेक्षा जास्त ‘सर्वगुणी’ महिला अस्सल महाराष्ट्रीय पेहराव नऊवारी साडी आणि त्याला साजेसा साजशृंगार करून एका पिलियन रायडरसह बाईक राइड करत सहभागी झाल्या होत्या. ख्यातनाम मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने या उपक्रमाचा शुभारंभ केला आणि पुण्यामध्ये या 3 किमी रॅली राइडमध्ये सहभागी झालेल्या महिला बायकर्ससोबत बातचीत देखील केली.
टाटा टी प्रीमियम ब्रँड असे मानतो की मराठी महिलांचा खास गुण म्हणजे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्या एकाचवेळी अनेक वेगवेगळ्या भूमिका अगदी खुबीने आणि प्रचंड ताकदीने निभावतात आणि म्हणूनच मराठी महिला म्हणजे ‘सर्वगुणी’ वृत्तीचे साकार रूप आहेत. मराठी महिला टाटा टी प्रीमियम चहाप्रमाणेच सर्वगुणसंपन्न आहेत, ज्यामध्ये अप्रतिम स्वाद, दमदारपणा आणि सुगंध यांचा अद्वितीय मिलाप आहे.
सर्वगुणी मराठी महिलांचा सन्मान टाटा टी प्रीमियमने आपल्या टीव्हीसीमधून तर केलाच आहे आणि आता त्याही पुढे एक पाऊल उचलून इतक्या शानदार कार्यक्रमाचे प्रत्यक्ष आयोजन देखील केले. महाराष्ट्रातील ग्राहकांसोबतचे आपले नाते अधिकधिक दृढ व गहिरे करण्यासाठी हा ब्रँड किती उत्सुक आहे हे यामधून दिसून येते.
या कॅम्पेनबद्दल अधिक माहिती देताना टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे पॅकेज्ड बेव्हरेजेसचे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रेसिडेंट श्री. पुनीत दास यांनी सांगितले, महाराष्ट्रातील लोकांसोबत भावनिक नाते अधिक दृढ करून राज्याचा अभिमान असलेली वैशिष्ट्ये ठळकपणे दर्शवणे हा टाटा टी प्रीमियमचा उद्देश आहे. स्थानिक परंपरा, संस्कृती व स्थानिक वैशिष्ट्यांचा सन्मान करण्याच्या आमच्या धोरणाला अनुसरून आम्ही प्रत्येक क्षेत्राची वैशिष्ट्ये दर्शवणारे उपक्रम सादर करत आहोत ज्यामुळे ग्राहकांची या ब्रँडमधील रुची अधिकाधिक वाढेल.
टाटा टी प्रीमियमने महाराष्ट्रातील लोकांची आवडनिवड लक्षात घेऊन तयार केलेल्या, बहुगुणी मिश्रणाप्रमाणेच ’सर्वगुणी’ असलेल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी महिला बाईक रॅली शोभायात्रेचे आयोजन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे या उपक्रमामुळे गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित होईल आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, महाराष्ट्राचा गौरव ठळकपणे सर्वांसमोर
येईल.
यावेळी ढोलताशाच्या गजरात सर्वगुणी महिलांचे स्वागत करण्यात आले, विशेष सजावट आणि प्रॉप्स उपलब्ध असलेले फोटो बूथ लावून फोटो काढून घेण्याची सोय करण्यात आली होती. दर्शकांना टाटा टी प्रीमियम चहा पाजण्यात आला, सॅम्पलिंगसाठी पॅकेट्स देखील देण्यात आली. यावेळी कोविडपासून बचावासाठी सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येत होते. याआधी टाटा टी प्रीमियमने दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशामध्ये देखील त्या-त्या क्षेत्रांची वैशिष्ट्ये दर्शवणारे उपक्रम आयोजित केले होते.