मुंबई : देशातील वाहनांचे पेट्रोल-डिझेलवरील परावलंबन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. याचाच भाग म्हणून आता भारतात हायड्रोजन वर चालणारी वाहने दिसू लागत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर चालणार्या टोयोटा मिराईचा वापर देखील सुरू केलाय. या महत्त्वाच्या इंधनाच्या भारतात उत्पादन होण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. चएखङ च्या मालकीच्या ड्रिलमेक ने इन्द्रोजेना या कंपनीची स्थापना केली आहे. ही स्टार्टअप कंपनी अल्ट्रा-क्लीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी लागणार्या पायरोलिटिक कन्व्हर्टरच्या संशोधन विकासासाठी आणि त्याच्या औद्योगिक उत्पादनासाठी काम करणार आहे शतकांपासून प्रतीक्षेत असणारी ही प्रक्रिया आता खरोखरच क्रांती घडवणार आहे. कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाशिवाय हायड्रोजनचे उत्पादन यातून होणार आहे. कन्व्हर्टरद्वारा हायड्रोजनचे उत्पादन हे थेट इंधन स्टेशन्सवर केल्यामुळे साठा करणे आणि वाहतूक खर्च यात लक्षणीयरीत्या घट होते तसेच हायड्रोजनचा प्रवासादरम्यानचा धोका देखील नाहीसा होतो. हा प्रकल्प चालवण्यासाठी अल्प प्रशिक्षणाची गरज आहे तसेच प्रकल्प वापरण्यास सुरक्षित आहे. कुठल्याही प्रदूषण करणार्या उत्प्रेरकांचा वापर यात होणार नाही तसेच यातून कोणताही कचरा निर्माण होणार नाही. यातून उत्पादित झालेला हायड्रोजन हा औद्योगिक वापर आणि स्थानिक सार्वजनिक वाहतुकीची गरज भागवू शकेल.
विमान प्रवास महागणार? आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा झटका
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. विमान इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विमानाचे इंधन एटीएफचे दर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार एटीएफचे भाव 1,12,925 किलोलिटरवर पोहोचले आहेत. भाववाढीपूर्वी एटीएफचे दर 1,10,666 रुपये किलोलिटर होते. नवे दर येत्या 15 एप्रिल 2022 पर्यंत लागू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात सातव्यांदा एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव तब्बल दहा दिवसांनंतर आज स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भावात आज कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 6.84 पैशांनी वाढले आहेत.
विमान प्रवास महागणार?
विमान इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होतच आहे. आज पुन्हा एकादा एटीएफमध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार जेट फ्यूलचे दर 1,12,925 किलोलिटरवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात एटीएफमध्ये तब्बल सातवेळा वाढ झाली आहे. एटीएफमध्ये होत असलेली ही वाढ पाहाता विमान कंपन्या देखील तिकीट वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोना काळात विमान सेवा ठप्प असल्याने आधीच मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आता इंधनाचे दर वाढल्याने त्यात आणखी भर पडली आहे. इंधन दरवाढीसंदर्भात दिलासादायक बामती समोर येत आहे. 22 मार्चपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत होती. दहा दिवसांमध्ये तब्बल नऊ वेळा भाव वाढवण्यात आले होते. मात्र आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, भाव स्थिर आहेत.