जानोरी गाव पाच कोटींचे बक्षीस घेणारच

सोनाली कुलकर्णी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत संवाद

दिंडोरी : अशोक केंग
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मला जानोरी गावाला येण्याची संधी मिळाली असून, जानोरी गाव फारच सुंदर आहे. पाच कोटींचे बक्षीस घेणारच, असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केला.

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानांतर्गंत ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जानोरी गावात आली होती. सुरुवातीला तिचे महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम व ढोल-ताशांच्या पथकाने स्वागत केले. त्यानंतर अभिनेत्री कुलकर्णी हिच्या हस्ते सेल्फी पॉइंटचे उद्घाटन व वृक्षारोपण झाले. त्यानंतर सोनाली कुलकर्णी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांना बैलगाडीतून जानोरी गावात झालेली विकासकामे, तसेच जानोरी गावातील रस्ते, घरे, मंदिरे दाखविण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी प्लास्टिकमुक्तीसाठी बसवण्यात आलेल्या मशिनचे उद्घाटन केले.
मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे स्वागतगीताने स्वागत केले. अभिनेत्री कुलकर्णी, वर्षा फडोळ व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीमातेचे पूजन केले. यावेळी महात्मा फुले विद्यालयातील व जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी अभिनेत्री कुलकर्णी हिने ग्रामस्थांशी संवाद साधला. मला बैलगाडीत बसवून गावातील मोठ-मोठे वाडे, जुन्या पद्धतीची सुंदर घरे, गावात विकासकामे झाली आहेत. पुरातन काळातील मंदिरे दाखविण्यात आली. गावात अनेक चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे. त्यामुळे तुमच्या गावाला सेलिब्रेटी या अभियानासाठी आलेच पाहिजे अशी काही गरज नाही. कारण जानोरी गावात सुंदर विकासकामे झाली आहेत. त्यामुळे जानोरी गावाला पाच कोटींचे बक्षीस मिळणारच, असे अभिनेत्री कुलकर्णी हिने सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, दिंडोरी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामपंचायत सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, रोहिणी वाघ, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब खांडेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, दिंडोरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, अंगणवाडी मुख्य परवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना तसेच शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Janori village will receive a prize of five crores

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *