नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाने तसेच संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव सरचिटणीस रवींद्र देवरे तसेच इलेक्ट्रॉनिका टंगस्टन लिमिटेड च्या वतीने राहुल शुक्ला भालचंद्र पाठक ,रमेश गडगे ,चंद्रकांत निकम या सर्वांच्या उपस्थितीत कामगार उपआयुक्त अधिकारी शर्वरी पोटे यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पगार वाढीचा करार झाला. या प्रसंगी संघटनेच्या वतीने राजु पगार, प्रदिप शेळके, जालिंदर हापसे, रघुनाथ गोळेसर व बाजीराव कोठुळे हे उपस्थित होते.
अशी होणार पगारवाढ
कराराचा कालावधी :- तीन वर्षे चार महिने
एकुण पगारवाढ :- 9500/- प्रथम वर्ष :- 3800
द्वितीय वर्ष :- 3325
तृतीय वर्ष :-2375
तसेच अतिरिक्त 500:- d.o.t. स्कीम मध्ये असतील.
उत्पादकता वाढ दहा टक्के असेल.
कराराचा कालावधी :- तीन वर्ष चार महिने
1एप्रिल 2021 ते31 जुलै2024 फरकाची रक्कम 46 हजार रुपये प्रत्येकी दोन टप्प्यात मे आणि जून महिन्याच्या पगारात मिळणार आहे