उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. यामुळे मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली उतरवण्यात आलेे.
आज होणार अंत्यसंस्कार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात बुधवारी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.