सातारा :
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. कराडच्या प्रीतिसंगमावर असलेली यशवंतराव चव्हाण यांची समाधी हे पवार कुटुंबाचं ऊर्जास्थळ राहिलं आहे. त्याठिकाणी नतमस्तक होऊन यशवंतराव चव्हाण यांचे सुनेत्रा पवार यांनी आशीर्वाद घेतले. त्यांच्या दौर्यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या प्रीतिसंगमावरील आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.
Sunetra Pawar’s greetings to Yashwantrao Chavan on Preeti Sangama