चारचाकी वाहनांसाठी आजपासून आरटीओत नवीन मालिका

पंचवटी : प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे चारचाकी वाहनांसाठी (एमएच 15-केयू) ही नवीन मालिका गुरुवार(दि.5)पासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीनिवास जेल्लावार यांनी दिली.
आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 2.30 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या आवक-जावक कक्ष क्रमांक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही. तसेच राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍या 6 व्यक्ती/संस्थेच्या नावे हस्तांतरित होणार नाही. भरलेले शासकीय शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल. ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल, अशा अर्जदारांनी लिलावामध्ये भाग घेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शुक्रवारी (दि.6) दुपारी चार वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी कोणत्याही बोलीच्या रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा.

New series for four-wheelers in RTO from today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *